जागावाटपाबाबत भाजपाची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत दिल्लीत भाजपाची रात्री बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या बैठकीला उपस्थित असतील. बैठकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या जागांबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील. राज्यातील नेते भाजपाच्या वरिष्ठ […]

जागावाटपाबाबत भाजपाची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत दिल्लीत भाजपाची रात्री बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या बैठकीला उपस्थित असतील. बैठकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या जागांबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील. राज्यातील नेते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेतील. महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न पुढील दोन – चार दिवसांत सुटेल, असे संकेत महायुतीकडून दिले जात आहेत.

याआधी महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० जागांवर भाजपा, १० जागांवर शिवसेना आणि ८ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेची निवडणूक लढेल, अशी चर्चा होती. पण जागावाटपाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सहकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने २५ जागा लढवून २३ जिंकल्या तर शिवसेनेने २३ जागा लढवून १८ जिंकल्या होत्या. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा राज्यातून २५ पेक्षा जास्त जागांवर लढण्यास उत्सुक आहे तर शिवसेना मागच्यावेळी लढवल्या त्या जागा पुन्हा लढवण्यास उत्सुक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number