प्रियांकाची माघार, अमेठीत काँग्रेसला उमेदवार मिळेना ?

नवी दिल्ली, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघांमधून कोण लढणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. राहुल गांधी अमेठीतून माघार घेणार आणि वायनाडमधून लढणार तर प्रियांका गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरणार नाही असे सूत्रांकडून समजते. अनेक वर्षे उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली हे दोन काँग्रेसचे […]

प्रियांकाची माघार, अमेठीत काँग्रेसला उमेदवार मिळेना ?

नवी दिल्ली, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघांमधून कोण लढणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. राहुल गांधी अमेठीतून माघार घेणार आणि वायनाडमधून लढणार तर प्रियांका गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरणार नाही असे सूत्रांकडून समजते.

अनेक वर्षे उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली हे दोन काँग्रेसचे सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखले जात होते. पण यावेळी रायबरेलीतून लढण्याऐवजी सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणे पसंत केले. यामुळे रायबरेलीतून प्रियांका वाड्रा तर अमेठी आणि वायनाड या दोन मतदारसंघांतून राहुल गांधी निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू झाली. पण सूत्रांकडून मिळत असलेल्या ताज्या माहितीमुळे प्रियांकांनी माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षित मतदारसंघातून नशीब आजमावण्याऐवजी प्रियांका यांनी माघार घेण्याची तयारी केल्यामुळे काँग्रेसला पराभवाची भीती सतावू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

प्रियांका वाड्रा लोकसभा निवडणूक लढणार नाही – सूत्र
राहुल गांधी वायनाड मधूनच लोकसभा लढण्याची शक्यता
अमेठीतून काँग्रेसचा उमेदवार सध्या गुलदस्त्यात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number