मराठवाड्यावर अवकाळीचे ढग

प्रतिनिधी, मराठवाडा, दि. ०७ मार्च २०२४ : विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीचे ढग आले असून पुढील २४ तासांत हिंगोली, परभणी, बीड, अमरावतीत पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आजही देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड भागात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातही […]

मराठवाड्यावर अवकाळीचे ढग

प्रतिनिधी, मराठवाडा, दि. ०७ मार्च २०२४ : विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीचे ढग आले असून पुढील २४ तासांत हिंगोली, परभणी, बीड, अमरावतीत पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आजही देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड भागात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम असून या भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तर, पुढील २४ तासात हिंगोली, परभणी, बीड अमरावती या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number