क्रूरकर्मा शाहजहाँ सीबीआयच्या ताब्यात

कोलकाता, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : शेख शाहजहाँला अखेर सीबीआयने ताब्यात घेतले आहे. संदेशखाली प्रकरणातला मुख्य आरोपी शाहजहाँ ५५ दिवस फरार होता. त्यानंतर त्याला अटक झाली मात्र तुरुंगात त्याची मौजमजा सुरू होती. त्याला सरकारचे संपूर्ण पाठबळ होते, असे आम्ही म्हणत नाही आहोत या शब्दात कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ताबडतोब शाहजहाँला सीबीआयच्या […]

क्रूरकर्मा शाहजहाँ सीबीआयच्या ताब्यात

कोलकाता, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : शेख शाहजहाँला अखेर सीबीआयने ताब्यात घेतले आहे. संदेशखाली प्रकरणातला मुख्य आरोपी शाहजहाँ ५५ दिवस फरार होता. त्यानंतर त्याला अटक झाली मात्र तुरुंगात त्याची मौजमजा सुरू होती. त्याला सरकारचे संपूर्ण पाठबळ होते, असे आम्ही म्हणत नाही आहोत या शब्दात कोलकत्ता उच्च न्यायालयाने ममता सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ताबडतोब शाहजहाँला सीबीआयच्या ताब्यात द्या असे निर्देश दिले. गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. संदेशखाली प्रकरणात बुधवारी देखील मोठ्या घडामोडी घडल्या कारण संदेशखाली गाव ज्या मतदारसंघात येतं त्याच ठिकाणी पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. आजच्या या कार्यक्रमात आपण आतापर्यंत काय घडामोडी घडल्या याचाच उहापोह करणार आहोत.

क्रूरकर्मा शाहजहाँ सीबीआयच्या ताब्यात
कोलकत्ता उच्च न्यायालयाचा ममतांना दणका
संदेशखाली प्रकरणामुळे ममता सरकार गोत्यात
संदेशखाली प्रकरणाचा तपास आता केंद्रीय यंत्रणेकडे
पंतप्रधान मोदींनी घेतली संदेशखालीतील महिलांची भेट

अटक म्हणजे शहाजहानला पोलीस संरक्षण

तृणमूल काँग्रेसचा नेता आणि संदेशखाली येथे महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचा आरोपी शेख शाहजहान याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेखच्या वकिलांनी जामिनासाठी हायकोर्टात पोहोचून या खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली, मात्र न्यायालयाने नकार देत त्याच्याबद्दल सहानुभूती नाही, त्याला अटकेत राहू द्या, असे सांगितले. सुनावणीदरम्यानही शहाजहान कोर्टात उद्धटपणा दाखवत होता. यापूर्वी उच्च न्यायालयाने शेखला १५ दिवसांत अटक करण्याचे आदेश दिले होते. शहाजहान शेखच्या अटकेबाबत आता भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आणि बंगाल पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “आज अचानक शाहजहान शेखला अटक करण्यात आली. “संदेशखालीच्या महिलांच्या तक्रारीवरून शाहजहानवर बलात्कार किंवा बलात्कारासाठी प्रवृत्त करण्याचे कोणतेही कलम लावण्यात आलेले नाही.”

संदेशखाली प्रकरणावरील भाजपाची प्रतिक्रिया

संदेशखाली प्रकरण जेव्हापासून समोर आलं तेव्हापासून शाहजहाँला पाठीशी घालण्याचं काम ममता सरकार करत असल्याचं भाजपा नेते बोलताना दिसतायेत. मुळात संदेशखालीमध्ये महिलांवर गेल्या कित्येक वर्षांपासून अत्याचार होत होता त्याला देखील ममतांचा वरदहस्त असल्याचं अनेकदा दिसून आलं.

कोण आहे शाहजहाँ ?

शाहजहां शेख हा तृणमूलचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांचा निकटवर्तीय
संदेशखालीत तृणमूलचा ब्लॉक अध्यक्ष
आधी फेरीवाला, २००३ मध्ये स्थानिक राजकारणात प्रवेश
समाजसेवेच्या नावाखाली परिसरात दमदाटी
शाहजहांवर दुहेरी हत्याकांडाचा आरोप
शाहजहांकडे करोडोची संपत्ती असल्याचा दावा

कोलकत्ता उच्च न्यायालयाचे निरीक्षण

कोलकत्ता उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान निरीक्षण नोंदवलं की, संदेशखाली प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख शहाजहाँ याचा सरकारशी जवळचा संबंध असून त्याचा सरकार आणि पोलिसांतील अनेकांवर प्रभाव आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणी लपाछपीचा खेळ खेळत आहेत, त्यामुळं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं हस्तांतरित करणं गरजेचं आहे. त्यामुळं सरकारनं आरोपीची कोठडी सीबीआयला द्यावी, असं कोलकत्ता उच्च न्यायालयाने म्हटलं. या सर्व घडामोडींचा घटनाक्रम पाहुयात ….

पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बंगाल दौऱ्यात संदेशखाली येथील 5 पीडित महिलांची भेट घेतली. त्यांनी त्यांची कहाणी मांडली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकले. पंतप्रधानांना त्यांच्या वेदना समजल्यानं पीडित महिला खूप भावूक झाल्या होत्या, भाजपशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी त्यांच्या बंगाल दौऱ्यात बारासात येथे एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. हा परिसर संदेशखालीजवळ येतो. यावेळी ममता सरकार महिला विरोधी असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आणि या संदेशखाली प्रकरणावर जोरदार टीका केली. याआधी सुद्धा पंतप्रधान मोदींची सभा पश्चिम बंगालमध्ये झाली होती तेव्हा पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावर मोदींनी ममता यांच्यावर टीका केली होती आणि विरोधकांना सुद्धा सवाल केला होता.

‘संदेशखाली प्रकरणावर विरोधक गप्प का ?’
पंतप्रधान मोदींचा विरोधकांना थेट सवाल

अधीर रंजन चौधरी यांना पोलिसांनी अडवले

पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांना शुक्रवारी अशांत संदेशखाली भागात जाण्यासाठी थांबवण्यात आले , जे टीएमसी नेत्यांनी गावकऱ्यांवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ हादरले आहे . चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या काँग्रेसच्या रॅलीला पोलिसांनी सुरुवातीला सरबेरिया येथे आणि नंतर उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळीच्या मार्गावर रामपूर येथे थांबवले .

पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेशांचा हवाला दिला कारण काँग्रेसच्या टीमला संदेशखळीला जाण्याची परवानगी दिली नाही. चौधरी यांनी ममता बॅनर्जी सरकार या मुद्द्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत विरोधी राजकीय पक्षांना संदेशखळीत का जाऊ दिले जात नाही, असा सवाल केला. ” संदेशखळीत येण्यापासून विरोधी पक्षांना का रोखलं जातंय? राज्य सरकार काय लपवू पाहतंय? त्यावर राजकारण का करतंय?” चौधरी म्हणाले.

तृणमूल नेता तापस रॉय भाजपात

पश्चिम बंगालमधील संदेशखालीच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) राजीनामा देणारे पक्षाचे माजी नेते तापस रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संदेशखाली आणि राज्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रॉय यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ​​आमदारपदाचा राजीनामाही दिला होता. तापस रॉय यांनी भाजप नेते सुवेंदू अधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष सकुंत मजुमदार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

कोण आहेत तपास रॉय ?

पाच वेळा तृणमूलचे आमदार
पहिल्यांदा १९९६ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर विजयी
२००१ मध्ये काँग्रेसशी सोडचिठ्ठी तृणमूलमध्ये प्रवेश.
२०११ मध्ये उत्तर २४ परगना मतदारसंघातून विजयी
ममता सरकारवर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे रॉय कंटाळले
६ मार्च २०२४ ला तृणमूल सोडली, भाजपात प्रवेश

रॉय काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये आले. ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत २५ वर्षे राहिले. राजीनामा दिल्यानंतर रॉय यांनी आरोप केला होता की ईडीने त्यांच्यावर कारवाई केली तेव्हा पक्षाने त्यांना पाठिंबा दिला नाही. आपल्याला पक्षात योग्य स्थान मिळाले नाही, असेही रॉय म्हणाले होते. रॉय यांनी टीएमसीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले होते. तापस रॉय यांनी आमदारकीचा राजीनामा देताना तृणमूल काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रॉय यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी आता मुक्त पक्षी असल्याचे म्हटले होते. पक्षात तापस रॉय यांचा उत्तर कोलकाता येथील टीएमसी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांच्यासोबत बराच काळ वाद सुरू होता. भाजप त्यांना उत्तर कोलकातामधूनही तिकीट देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तापस रॉय १९९६ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विद्यासागर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. रॉय यांनी २००१ मध्ये टीएमसीच्या तिकिटावर बारा बाजारमधून विधानसभा निवडणूक जिंकली होती. यानंतर ते २०११ मध्ये उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बारानगर विधानसभा मतदारसंघात गेले. येथूनही त्यांना विजय मिळवण्यात यश आले. तेव्हापासून ते या जागेवरून टीएमसीचे आमदार होते. रॉय हे सध्याच्या विधानसभेत टीएमसीचे डेप्युटी चीफ व्हिप देखील होते. ईडीने जानेवारी महिन्यात तापस रॉय यांच्या घरावर छापा टाकला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number