मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी ३० जागा भाजपा तर १० जागा शिवसेना आणि ८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या जागा वाटपामुळे शिवसेना नाराज असल्याचे वृत्त आहे.
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. यापैकी १८ जागांवर शिवसेना विजयी झाली होती. पण यावेळी शिवसेनेच्या वाट्याला फक्त दहाच जागा येणार आहेत. यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे वृत्त आहे.
भाजपाने लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत राज्यातून २५ जागा लढवल्या होत्या. यापैकी २३ जागांवर त्यांचा विजय झाला होता. यावेळी भाजपा राज्यातून ३० जागा लढवणार आहेत. भाजपा लढवणार असलेल्या जागांमध्ये पाचची वाढ झाली आहे तर शिवसेना लढवणार असलेल्या जागांमध्ये १३ ची घट झाली आहे. यामुळे शिवसेनेचे नेते नाराज असल्याचे वृत्त आहे.