राजू शेट्टी स्वतंत्र लढणार ?

कोल्हापूर, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. आमच्या मागण्या मान्य होणार नसतील तर महाविकास आघाडीसोबत का राहावे, असा प्रश्न उपस्थित करत राजू शेट्टी यांनी मविआतून बाहेर पडत असल्याचे संकेत दिले. मविआच्या जागा वाटपाच्या मागील काही बैठकांना राजू […]

राजू शेट्टी स्वतंत्र लढणार ?

कोल्हापूर, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. आमच्या मागण्या मान्य होणार नसतील तर महाविकास आघाडीसोबत का राहावे, असा प्रश्न उपस्थित करत राजू शेट्टी यांनी मविआतून बाहेर पडत असल्याचे संकेत दिले. मविआच्या जागा वाटपाच्या मागील काही बैठकांना राजू शेट्टी गैरहजर होते. राजू शेट्टींच्या अनुपस्थितीमुळेच ते मविआतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर राजू शेट्टी यांनीच मविआतून बाहेर पडून स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केल्याचे सूतोवाच केले आहे.

लोकसभेच्या सहा जागा लढवणार

स्वाभिमानी पक्ष लोकसभेच्या सहा जागा लढवणार असे राजू शेट्टी यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, परभणी आणि माढा या मतदारसंघांतून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

कोण आहेत राजू शेट्टी ?

स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे महाराष्ट्रातील एक शेतकरी नेते आहेत. राज्यातील निवडक भागांमध्ये त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रभाव आहे. ते २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले येथून निवडून आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number