छत्रपती संभाजीनगर , ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. शहांच्या दौऱ्यानिमित्त जय्यत तयारी सुरु असून आता शहराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.मंगळवारी सायंकाळी साडेसहाला त्यांची खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे जाहीर सभा पार पडणार आहे.
असा असेल दौरा
आज रात्री १० वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन होईल,तेथून हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे येऊन मुक्कामी राहतील.त्यानंतर मंगळवारी (५ मार्च रोजी) सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून अकोल्याच्या दिशेने जातील तसेच अकोला आणि जळगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायंकाळी साडे पाच वाजे दरम्यान छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येतील आणि ६ वाजेला ते क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यर्पण करून मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर दाखल होऊन जाहीर सभा घेतील.त्यानंतर छत्रपती संभाजी नगर विमानतळाकडे रवाना होतील.