मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बीसीसीआयने २०२३-२४ साठीचा वार्षिक करार जाहीर केला. या करारात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या ग्रेड ए प्लसमध्ये ठेवण्यात आले आहे. या ग्रेडमधील खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळतात. तर श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना करारातून वगळण्यात आले आहे. शुभमन गिल, केएल राहुल आणि जलद गोलंदाज मोहम्मद सिराज यांना ग्रेड बी मधून ग्रेड ए मध्ये घेण्यात आले आहे. फिरकीपटू अक्षर पटेल आणि गेल्या वर्षी कार अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत हे ए मधून बी ग्रेडमध्ये गेले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या यशस्वी जयस्वालचा समावेश ग्रेड बी मध्ये झाला आहे.
ग्रेड ए प्लस- रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा
ग्रेड ए- आर.अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या
ग्रेड बी- सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल
ग्रेड सी- रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दूल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार