राज्यसभेत रालोआकडे किती जागा ?

नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभेच्या वेगेवगळ्या राज्यांतील जागांसाठीची निवडणूक मंगळवारी झाली. या निवडणुकीच्या निकालाअंती राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वातील रालोआकडे ११७ जागा झाल्या आहेत. राज्यसभेच्या २४० पैकी ११७ जागा मिळवणारी रालोआ बहुमतापासून फक्त चार जागांच्या अंतरावर आहे. अर्थातमोदी सरकार राज्यसभेत बहुमत नसले तरी राजकीय मैत्रीच्या जोरावर अनेक विधेयकं सहज मंजूर करून घेण्यात यशस्वी झाले […]

राज्यसभेत रालोआकडे किती जागा ?

नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभेच्या वेगेवगळ्या राज्यांतील जागांसाठीची निवडणूक मंगळवारी झाली. या निवडणुकीच्या निकालाअंती राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वातील रालोआकडे ११७ जागा झाल्या आहेत. राज्यसभेच्या २४० पैकी ११७ जागा मिळवणारी रालोआ बहुमतापासून फक्त चार जागांच्या अंतरावर आहे. अर्थात
मोदी सरकार राज्यसभेत बहुमत नसले तरी राजकीय मैत्रीच्या जोरावर अनेक विधेयकं सहज मंजूर करून घेण्यात यशस्वी झाले आहे. पुढील सहा महिन्यात राज्यसभेच्या आणखी काही जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीद्वारे भाजपाच्या नेतृत्वातील रालोआ राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठेल, असा अंदाज राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.

निवडणूक आयोगाने देशातील पंधरा राज्यांतील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी फक्त सोळा जागांसाठी निवडणूक झाली. इतर ४१ जागांसाठी बिनविरोध निवड झाली. ज्या सोळा जागांसाठी निवडणूक झाली त्यापैकी दहा जागा उत्तर प्रदेशमध्ये, पाच कर्नाटकमध्ये आणि एक हिमाचल प्रदेशात होती. उत्तर प्रदेशात दहा पैकी आठ जागांवर, तर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एका जागेवर भाजपाचा उमेदवार विजयी झाला. याआधी भाजपाच्या वीस उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. निकालाअंती ५६ पैकी ३० जागा एकट्या भाजपाने सहज जिंकल्या.

राज्यसभा : २४५ एकूण सदस्य संख्या
सध्याची राज्यसभेतील सदस्य संख्या : २४०
बहुमत : १२१
भाजपाच्या नेतृत्वातील रालोआ (NDA) : ११७
रालोआच्या ११७ पैकी भाजपाच्या सदस्यांची संख्या : ९७
राज्यसभेतील रिक्त असलेल्या जागा : जम्मू काश्मीरच्या चार आणि एक नामनिर्देशित अशा पाच जागा रिक्त

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number