राज्यसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश या तीन राज्यांतील राज्यसभेच्या पंधरा जागांसाठी मंगळवार २७ फेब्रुवारी मतदान झाले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग अर्थात दुसऱ्या पक्षाला मतदान झाले. यामुळे मोदी विरोधकांचे निवडणुकीच्या निकालाचे अंदाज चुकले. हिमाचलमध्ये नऊ आणि उत्तर […]

राज्यसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश या तीन राज्यांतील राज्यसभेच्या पंधरा जागांसाठी मंगळवार २७ फेब्रुवारी मतदान झाले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग अर्थात दुसऱ्या पक्षाला मतदान झाले. यामुळे मोदी विरोधकांचे निवडणुकीच्या निकालाचे अंदाज चुकले. हिमाचलमध्ये नऊ आणि उत्तर प्रदेशमध्ये आठ आमदारांनी क्रॉस व्होटिंग अर्थात दुसऱ्या पक्षाला मतदान केल्याचे उघड झाले.

उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या दहा पैकी आठ जागांवर भाजपाचा तर दोन जागांवर समाजवादी पक्षाचा विजय झाला. समाजवादीच्या तिसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. तर हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एकमेव जागेवर भाजपाचे हर्ष महाजन विजयी झाले. काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. कर्नाटकमध्ये राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तीन, भाजपाचा एक आणि जनता दल धर्मनिरपेक्षचा अर्थात जेडीएसचा एक असे पाच उमेदवार विजयी झाला. भाजपाच्या एका आमदाराने क्रॉस व्होटिंग केले आणि एका आमदाराने मतदान करणेच टाळले.

कर्नाटक काँग्रेसचे विजयी उमेदवार – अजय माकन, सय्यद नासिर हुसेन, जीसी चंद्रशेखर
भाजपाचा विजयी उमेदवार – नारायणसा बंदागे
जनता दल धर्मनिरपेक्षचा विजयी उमेदवार – कुपेंद्र रेड्डी

हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या जागेचा निकाल जाहीर होताच सत्ताधारी काँग्रेस अल्पमतात असल्याचा दावा भाजपाने केला. काँग्रेसच्या सहा आणि इतर पक्षाच्या तीन आमदारांनी भाजपाला मतदान केले. भाजपाचे हर्ष महाजन आणि काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांना प्रत्येकी ३४ मते मिळाली. अखेर नाणेफेक करून भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number