पवार जरांगेंना भेटले

बारामती, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : नोज जरांगे उपोषणाला बसले आणि त्यांच्यावर लाठीहल्ला झाला, त्यावेळी त्यांना भेटायला जाणारा मी पहिला व्यक्ती होतो. दोन समाजात अंतर पडेल असं काही करू नका, असा सल्ला मी त्यांना त्याक्षणी दिला; असे राशपचे शरद पवार म्हणाले. ते बारामती येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. माझे आणि जरांगे यांचे कॉल रेकॉर्ड तपासा, […]

पवार जरांगेंना भेटले

बारामती, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : नोज जरांगे उपोषणाला बसले आणि त्यांच्यावर लाठीहल्ला झाला, त्यावेळी त्यांना भेटायला जाणारा मी पहिला व्यक्ती होतो. दोन समाजात अंतर पडेल असं काही करू नका, असा सल्ला मी त्यांना त्याक्षणी दिला; असे राशपचे शरद पवार म्हणाले. ते बारामती येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. माझे आणि जरांगे यांचे कॉल रेकॉर्ड तपासा, एक फोन जरी केला असेल तर वाटेल ते मान्य करेन, असे वक्तव्य करत पवारांनी जरांगेंना भेटलो पण कॉल कधीही केला नाही असे सांगितले. राजेश टोपे यांनी जरांगेंच्या आंदोलनाला हरतऱ्हेची मदत पुरवल्याचा आरोप पवारांनी फेटाळला. राज्य शासनानेच राजेश टोपेंची जरांगेंशी संवाद साधण्यासाठी मदत घेतली, असे पवार म्हणाले. आधी मदत घ्यायची नंतर आरोप करायचे हे कुठले राजकारण असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number