बारामती, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या चुलत भावाच्या अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नीच्या अनुभव क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सुनेत्रा पवारांच्या अनुभव क्षमतेवर सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला आहे.
बारामतीमध्ये शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा अजित पवार निवडणूक रिंगणात उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा सुरू असतानाच सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांच्या अनुभव क्षमतेवर आक्षेप घेतला आहे. पर्स आणि पेनाचा संदर्भ देत सुप्रिया यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केले. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा सुनेत्रा पवार यांनी समाचार घेतला.