मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी जुंपू नका, निवडणूक आयोगाने त्यांच्या कामासाठी पर्यायी यंत्रणा उभारावी; अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली. यानंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्य शासनाकडे एक मागणी केली आहे. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये येथे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत कामकाजाच्या दिवशी लावावे अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे. अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे.