मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट बंद

जालना, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद करण्यात आले आहे. जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मनोज जरांगे भांबेरी गावात रात्री मुक्कामाला […]

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट बंद

जालना, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद करण्यात आले आहे. जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मनोज जरांगे भांबेरी गावात रात्री मुक्कामाला होते. आता ते अंतरवाली सराटीत आहेत. याआधी राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या तरतुदींना मंजुरी दिली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येत असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना जरांगेंनी केलेल्या घोषणेमुळे पोलीस सावध झाले. यानंतर पोलिसांनी संचारबंदी, इंटरनेट बंद अशा स्वरुपाची कारवाई केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number