मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यातल्या महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. येत्या दोन तीन दिवसांत जागा वाटप केले जाईल, असे समजते. महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईत आले आहेत. नड्डांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागांचे वाटप केले जाईल. यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार यांच्यात प्रथमिक चर्चा होणार आहे. यानंतर दिल्ली किंवा मुंबईतून महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते.
महायुतीत जागावाटपावरुन हालचाली
‘महायुतीचं समीकरण दोन दिवसात जुळणार’
महायुतीतील मोठ्या नेत्याची ‘जय महाराष्ट्र’ला माहिती