बारामती, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : यंदा पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून राशपच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा अजित पवार निवडणुकीला उभ्या राहण्याची शक्यता आहे. या निमित्ताने नणंद भावजयीचा सामना बघण्याची संधी मिळणार आहे. जर असे झाले तर कोण जिंकणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. अजित पवारांच्या हाती राष्ट्रवादीचे नेतृत्व आले आणि अजित पवारांच्या विरोधकांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने राशप अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार हे नाव दिले. अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि या पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह आहे. तर सुप्रिया सुळे ज्या राशपमध्ये आहे त्यांना अद्याप निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. या परिस्थितीत बारामतीमध्ये काय होणार यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील आमदार
दौंड – आमदार राहुल कुल भाजपा
इंदापूर – आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
बारामती – आमदार अजित पवार, राष्ट्रवादी
पुरंदर – आमदार संजय जगताप, काँग्रेस
भोर – आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस
खडकवासला – आमदार भीमराव तापकीर, भाजपा
बारामतीची लोकसभा निवडणूक २०१४
सुप्रिया सुळे २०१४ मध्ये विजयी झाल्या पण त्यांचे घटलेले मताधिक्य पवारांसाठी चिंतेचा विषय झाले होते.
बारामती लोकसभा मतदारसंघ निकाल २०१४
बारामतीत अवघे ५८.८३ टक्के मतदान झाले
एकूण१८ लाख १३ हजार ५५३ मतदार
त्यापैकी १० लाख ६६ हजार ९६३ मतदारांनी आपला हक्क बजावला
सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीतचे महादेव जानकर अशी लढत
सुप्रिया सुळे यांना ५ लाख २१ हजार ५१२ मतं
महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मतं
सुप्रिया सुळे ६९ हजार ७१९ मतांनी विजयी
बारामतीची लोकसभा निवडणूक २०१९
सुप्रिया सुळे २०१९ मध्ये दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या कांचन राहुल कुल यांचा एक लाख ५५ हजार ७७४ मतांनी पराभव केला.
सुप्रिया यांना मिळाली ६ लाख ८६ हजार ७१४ मतं
कांचन कुल यांना मिळाली ५ लाख ३० हजार ९४० मतं
सुप्रिया यांचा विजय अवघ्या दीड लाखाच्या मताधिक्याने
सुप्रिया सुळे २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये जास्त मताधिक्याने निवडून आल्या. पण त्यांना अपेक्षित असलेले मोठे मताधिक्य दोन्ही निवडणुकांमध्ये मिळाले नव्हते. यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.