‘मी आहे तिथेच, कुठेही चाललो नाही’

सांगली, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मी आहे तिथेच, कुठेही चाललो नाही, असे राशपचे नेते आमदार जयंत पाटील म्हणाले. याआधी राशपला लवकरच आणखी एक धक्का बसणार… पश्चिम महाराष्ट्रातील राशपचा आणखी एक ताकदीचा नेता भाजपाच्या वाटेवर… अशा स्वरुपाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यानंतर प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांना पक्षांतर करणार का… महायुतीत सहभागी होणार का… भाजपामध्ये […]

‘मी आहे तिथेच, कुठेही चाललो नाही’

सांगली, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मी आहे तिथेच, कुठेही चाललो नाही, असे राशपचे नेते आमदार जयंत पाटील म्हणाले. याआधी राशपला लवकरच आणखी एक धक्का बसणार… पश्चिम महाराष्ट्रातील राशपचा आणखी एक ताकदीचा नेता भाजपाच्या वाटेवर… अशा स्वरुपाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यानंतर प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांना पक्षांतर करणार का… महायुतीत सहभागी होणार का… भाजपामध्ये प्रवेश करणार का ?… अशा स्वरुपाचे प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना मी आहे तिथेच, कुठेही चाललो नाही, असे राशपचे नेते आमदार जयंत पाटील म्हणाले.

पवारांसोबत असलेले बहुसंख्य खासदार आणि आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. यानंतर राशपला लवकरच आणखी एक धक्का बसणार, अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू झाल्यावर जयंत पाटील राशपतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. पणमी आहे तिथेच, कुठेही चाललो नाही, असे राशपचे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील वरकरणी जरी शरद पवारांच्या सोबत दिसत असले तरी त्यांच्या बाबत संशयाचे धुके निर्माण का व्हावे याची कारणे लक्षवेधी आहेत,

मुख्यमंत्री होण्याची जयंत पाटील यांची इच्छा आहे.
जयंत पाटील स्वतःला कायमच सर्वश्रेष्ठ समजत आले आहेत.
जयंत पाटील यांना फक्त शरद पवारांचे नेतृत्व मान्य आहे.
सुप्रिया यांच्या हाताखाली काम करायला जयंत पाटील मनापासून तयार नाहीत.
सुप्रियापेक्षा अजित पवार हा पर्यायही जयंत पाटलांना क्वचितच पटू शकतो.
जयंत पाटलांनी कायमच अजित पवारांना स्पर्धक मानले आहे.
मन मारूनच अजित पवारांच्या हाताखाली काम करणे पसंत करतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number