मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील १८ जागा लढवण्याची तयारी शिउबाठाने केली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून शिउबाठाने राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी १८ मतदारसंघांमध्ये निवडणूक समन्वयकांची नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वी शिउबाठाचे अधिवेशन झाले. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे निर्देश उद्धव यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना दिले. यानंतर शिउबाठाने राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी १८ मतदारसंघांमध्ये निवडणूक समन्वयकांची नियुक्ती केली आहे.