नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पक्ष चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर अर्ज करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राशपला दिले. याआधी ‘आमचं नाव काढून घेऊ नका… चिन्ह तरी मिळू द्या… राशप याच नावावर लोकसभा लढू द्या’ अशी कळकळीची विनंती राशपने सर्वोच्च न्यायालयात केली होती. पण निवडणूक आयोगाकडे पक्ष चिन्हासाठी अर्जच केला नव्हता. ही बाब निदर्शनास आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने राशपला पक्ष चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर अर्ज करण्याचे निर्देश दिले.
निवडणूक लढवण्यासाठी चिन्हाची गरज असते. हे चिन्ह देण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. यामुळे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कोणाला कोणते चिन्ह द्यावे याचा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. एखाद्या चिन्हावरून वाद असेल तर तो वाद घेऊन संबंधितांना निवडणूक आयोगाकडे दाद मागणे आवश्यक आणि बंधनकारक आहे. पण या नियमाला बगल देत सर्वोच्च न्यायालयात राशपने धाव घेतली होती.