मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभेची महाराष्ट्रातील सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. ‘जय महाराष्ट्र’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
राज्यसभेच्या २७ फेब्रुवारीला होणार असलेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी एक जागा काँग्रेस तर बाकीच्या पाच जागा महायुती लढवणार आहे. महायुतीकडून तीन जागा भाजपा, एक जागा शिवसेना, एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. जर सहा जागांसाठी सहाच उमेदवार दिले गेले तर निवडणूक बिनविरोध होणार आहे.
महाराष्ट्रातून काँग्रेसचा राज्यसभेसाठीचा उमेदवार – चंद्रकांत हंडोरे
महाराष्ट्रातून भाजपाचे राज्यसभेसाठीचे उमेदवार – अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे
महाराष्ट्रातून शिवसेनेचा राज्यसभेसाठीचा उमेदवार – मिलिंद देवरा (अधिकृत घोषणा लवकरच)
महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेसाठीचा उमेदवार – अद्याप घोषणा नाही