पुणे, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मंगलदास बांदल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे सूतोवाच काही माध्यम प्रतिनिधींसमोर केले. यानंतर राशप काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. पण राशपच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे किंवा तसा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितले. तसेच राशपच्या प्रशांत जगताप आणि शशिकांत शिंदेंनीही काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता फेटाळली आहे. मंगलदास बांदल ही व्यक्ती राशपची नेता किंवा प्रवक्ता नाही, त्यांच्याकडे पक्षाबाबत भूमिका मांडण्याचा अधिकार नाही, अशी माहिती राशपच्या प्रशांत जगताप आणि शशिकांत शिंदे यांनी दिली.