गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक

गडचिरोली, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सी – ६० सुरक्षा पथकाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. कांकेर – नारायणपूर – गडचिरोली पट्ट्यात हिद्दुर गावाजवळच्या जंगलात चकमक झाली. नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन गोळीबार करत पळ काढला. पळून गेलेल्या नक्षलवाद्यांना शोधण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. सुरक्षा पथकाने पळताना नक्षलवादी घटनास्थळी सोडून गेलेली […]

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक

गडचिरोली, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सी – ६० सुरक्षा पथकाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. कांकेर – नारायणपूर – गडचिरोली पट्ट्यात हिद्दुर गावाजवळच्या जंगलात चकमक झाली. नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन गोळीबार करत पळ काढला. पळून गेलेल्या नक्षलवाद्यांना शोधण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. सुरक्षा पथकाने पळताना नक्षलवादी घटनास्थळी सोडून गेलेली स्फोटके जप्त केली आहेत. जप्त केलेल्या साहित्यात डेटोनेटर, तारेच्या गुंडाळ्या (तारेची बंडले), आयईडी बॅटरी, सौरऊर्जा संयंत्र, नक्षलवाद्यांचे चिथावणी देणारे साहित्य आणि बॅग तसेच इतर साहित्यही आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number