उल्हासनगर, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ठाणे खंडणी विरोधी पथकाने आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी भाजपाचे पदाधिकारी आणि गणपत गायकवाड यांचा सहकारी व्यापारी विकी गणात्रा याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह ६ जणांविरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत गायकवाड, संदीप सरवणकर आणि हर्षल काणे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर आमदार पुत्र वैभव गायकवाड, साथीदार विकी गणात्रा आणि नागेश बडेकर हे फरार असल्याचे सांगण्यात आले.