पवारांनी किती चिन्हांवर लढवल्या निवडणुका ?

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ हे दोन्ही अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना सोपवले. शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांना पक्षासाठी नव्या नावाचे आणि नव्या निवडणूक चिन्हाचे प्रस्ताव घेऊन निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यसभा खासदार शरद […]

पवारांनी किती चिन्हांवर लढवल्या निवडणुका ?

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ हे दोन्ही अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना सोपवले. शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांना पक्षासाठी नव्या नावाचे आणि नव्या निवडणूक चिन्हाचे प्रस्ताव घेऊन निवडणूक आयोगाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यसभा खासदार शरद पवार यांचे ५ जुलै २०२३ रोजी केलेले भाषण व्हायरल होऊ लागले आहे. या भाषणात ‘चिन्ह गेलं तरी फरक पडत नाही’, असे पवार म्हणाले होते.

नेमकं पवार काय म्हणाले होते ?

बैलजोडीवर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गाय-वासरूवर लढलो, घड्याळवर लढलो. काही फरक पडला नाही…. चिन्ह घेऊन जात असाल तर कोणतंही चिन्ह असू द्या… जोपर्यंत सामान्यांच्या मनात पक्षाचा विचार जिवंत आहे, तोपर्यंत चिंता करण्याचे कारण नाही… असे शरद पवार ५ जुलै २०२३ रोजी केलेल्या भाषणात म्हणाले होते. ते मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बोलत होते. याप्रसंगी पवारांचे समर्थक उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number