मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाड आणि कांदिवली दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. बोरिवलीकडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या एका अवजड वाहनाने धडक दिल्यामुळे कचरा वाहतूक करणारी गाडी नॅनो कार आणि मालवाहतूक करणारा तीन चाकी टेम्पो यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.