‘हा विकृत राजकीय दृष्टीकोन’

नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बिगरभाजपा सरकार असणाऱ्या राज्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीवाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खोडून काढला. ‘काही राज्यांबाबत केंद्राकडून दुजाभाव केला जात असल्याची शंका व्यक्त करणे म्हणजे विकृत राजकीय दृष्टिकोनातून विशिष्ट धारणा दृढ करण्याचा प्रकार आहे. ही धारणा मांडताना काही स्वार्थी लोक अतिशय खूश आहेत, […]

‘हा विकृत राजकीय दृष्टीकोन’

नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बिगरभाजपा सरकार असणाऱ्या राज्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीवाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खोडून काढला. ‘काही राज्यांबाबत केंद्राकडून दुजाभाव केला जात असल्याची शंका व्यक्त करणे म्हणजे विकृत राजकीय दृष्टिकोनातून विशिष्ट धारणा दृढ करण्याचा प्रकार आहे. ही धारणा मांडताना काही स्वार्थी लोक अतिशय खूश आहेत, हे मला खेदाने म्हणावेसे वाटते,’ असे प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले. केंद्र सरकार वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार काम करते. केंद्रीय अर्थमंत्री वित्त आयोगाच्या शिफारसींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत. कोणीही अर्थमंत्री मला एखादे राज्य आवडत नाही. त्याचा निधी रोखा, असे म्हणू शकत नाही. तसे काम येथे चालत नाही,’ असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. कर्नाटक सरकारच्या खर्चाबाबत आम्ही बोलणार नाही. पण वित्त आयोगाच्या शिफारशींच्या विरोधात अर्थमंत्री या नात्याने आपण कोणताही निर्णय घेत नसल्याचे सांगत याबाबत काही विचारायचे असल्यास आयोगाशी बोलावे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number