पोलीस ठाण्यात गोळीबार, भाजपा आमदाराला पोलीस कोठडी

उल्हासनगर, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणात भाजपा आमदार गणेश गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आमदार गणेश गायकवाड यांना शनिवारी संध्याकाळी उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आमदार गणेश गायकवाड […]

पोलीस ठाण्यात गोळीबार, भाजपा आमदाराला पोलीस कोठडी

उल्हासनगर, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणात भाजपा आमदार गणेश गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आमदार गणेश गायकवाड यांना शनिवारी संध्याकाळी उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आमदार गणेश गायकवाड यांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी दिली.

शुक्रवारी संध्याकाळी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद झाला. हा वाद नंतर उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस ठाण्यात याच मुद्यावर चर्चा सुरू असताना गोळीबार झाला. या घटनेचे एक सीसीटीव्ही फूटेज समाज माध्यमात व्हायरल झाले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरीरातील गोळ्या काढण्यासाठी महेश गायकवाड यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आमदार गणेश गायकवाड यांना अटक करून शनिवारी संध्याकाळी उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले.

आमदार गणेश गायकवाड यांना पोलीस कोठडी

गोळीबार प्रकरणी आमदार गणेश गायकवाड यांना अकरा दिवसांची अर्थात १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच्या कालावधीसाठी पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस कोठडीत असलेल्या गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस ठाण्यात पहिल्या मजल्यावरील कोठडीत ठेवले आहे. त्यांना झोपण्यासाठी एक चटई देण्यात आली आहे. पोलीस कोठडीत पोलिसांकडून गणपत गायकवाड यांना जेवण दिले जाईल. घरचे जेवण मिळणार नाही. पोलीस कोठडीत असल्यामुळे गणपत गायकवाडना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number