मुंबई, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. राज्यात सर्वच ठिकाणी बुधवार ३१ जानेवारीपर्यंत शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण होणार नसल्याने सर्वेक्षणाच्या कामासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाला सर्वेक्षणाच्या कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात ५५ टक्के मराठा सर्वेक्षण पूर्ण
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ८१ टक्के सर्वेक्षण पूर्ण
मुळशी, आंबेगाव आणि इंदापूर तालुक्यात सर्वेक्षण प्रक्रिया सुरू
पुणे जिल्ह्यात खुल्या प्रवर्गातील दहा लाख ८१ हजार ७९५ कुटुंबांचे होणार सर्वेक्षण
वर्धा जिल्ह्यात ७० टक्के मराठा सर्वेक्षण पूर्ण