सीआरपीएफ तळावर नक्षलवाद्यांचा हल्ला

बीजापूर, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : छत्तीसगडमधील बीजापूर येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थात सीआरपीएफच्या तळावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले आणि १४ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीआरपीएफचे जवान आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक सुरू आहे. अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. सीआरपीएफचे कोब्रा जवान नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवत […]

सीआरपीएफ तळावर नक्षलवाद्यांचा हल्ला

बीजापूर, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : छत्तीसगडमधील बीजापूर येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थात सीआरपीएफच्या तळावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले आणि १४ जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीआरपीएफचे जवान आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक सुरू आहे. अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

सीआरपीएफचे कोब्रा जवान नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवत आहेत. ठिकठिकाणी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांना शोधून ठार करण्याची मोहीम कोब्रा जवानांनी हाती घेतली आहे. या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या तळावर हल्ला केला. हा हल्ला झाला तरी नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number