हेमंत सोरेन बेपत्ता ?

रांची, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता आहेत. ईडीने सोरेन यांच्या दोन गाड्या आणि ३६ लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. जमीन व्यवहाराच्या निमित्ताने आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांना चौकसीसाठी समन्स बजावले आहे. वारंवार समन्स बजावूनही ईडीला सामोरे जाणे टाळणाऱ्या हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले. यावेळी […]

हेमंत सोरेन बेपत्ता ?

रांची, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता आहेत. ईडीने सोरेन यांच्या दोन गाड्या आणि ३६ लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. जमीन व्यवहाराच्या निमित्ताने आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांना चौकसीसाठी समन्स बजावले आहे. वारंवार समन्स बजावूनही ईडीला सामोरे जाणे टाळणाऱ्या हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले. यावेळी गैरहजर राहिल्यास अटकेची कारवाई होण्याची शक्यता होती. हा धोका लक्षात येताच सोरेन गायब झाले. ते अद्याप ईडीच्या कार्यालयात आलेले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फरार झालेले सोरेन विशिष्ट पद्धतीने निवडक नागरिकांच्या संपर्कात आहेत. अटक टाळणे अशक्य झाले पत्नीला मुख्यमंत्री करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

ईडीचे समन्स आल्यावर गायब झाले हेमंत सोरेन
हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री
ईडीचे समन्स आल्यावर फरार झालेल पहिले मुख्यमंत्री

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number