मुंबई, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : रेल्वेत नोकरीची संधी आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रेल्वेची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली ताजी जाहिरात ट्वीट केली आहे. रेल्वेत सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागांवर भरती होणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा १८ ते ३० अशी आहे. इच्छुक मराठी तरुण – तरुणींनी जाहिरात बघून नियमानुसार अर्ज करावा, असे आवाहन राज यांनी केले आहे. मनसेच्या रोजगार आणि स्वयं-रोजगार विभागाने इच्छुक मराठी तरुण – तरुणींनी अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे आदेश राज यांनी दिले आहेत.