आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावरून मतभेद

मुंबई, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतेवेळी कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात ठिकठिकाणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तोंडी आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना गुन्हे मागे घेणार असे सांगितले आहे. पण याच मुद्यावरून राज्याच्या मंत्रिमंडळात मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री सर्व […]

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावरून मतभेद

मुंबई, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतेवेळी कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात ठिकठिकाणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तोंडी आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना गुन्हे मागे घेणार असे सांगितले आहे. पण याच मुद्यावरून राज्याच्या मंत्रिमंडळात मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री सर्व गुन्हे मागे घेऊ असे सांगत आहेत तर आंदोलनाचेच गुन्हे मागे घेऊ, गंभीर गुन्हे मागे घेणार नाही; असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. कॅबिनेट मंत्री असलेले छगन भुजबळ पण सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याच्या विरोधात आहेत. सर्व गुन्हे मागे घेण्यावर भुजबळ सातत्याने आक्षेप घेत आहेत. त्यांनी शनिवारी पण प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्यास विरोध असल्याचे जाहीर केले.

आंदोलनकांवरील गुन्हे मागे घेण्यावर मतभेद
मुख्यमंत्री म्हणतात ‘सर्व गुन्हे मागे घेऊ’
गृहमंत्री म्हणतात ‘आंदोलनाचेच गुन्हे मागे घेऊ, गंभीर गुन्हे नाही’
सर्व गुन्हे मागे घेण्यावर भुजबळांचाही आक्षेप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number