ओबीसी नेत्यांची बैठक

मुंबई, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. याआधी शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांना एका अधिसूचनेची प्रत दिली. यानंतर आंदोलकांनी मुंबईत पोहोचून आंदोलन करण्याऐवजी आपापल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आंदोलक परत जात असले […]

ओबीसी नेत्यांची बैठक

मुंबई, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. याआधी शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांना एका अधिसूचनेची प्रत दिली. यानंतर आंदोलकांनी मुंबईत पोहोचून आंदोलन करण्याऐवजी आपापल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आंदोलक परत जात असले तरी अधिसूचनेच्या मुद्यावर ओबीसी नेते घेत असलेल्या बैठकीमुळे पुढे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

मला माझ्या जातीचा अभिमान आहे…. मराठ्यांसाठी नेहमी लढत राहणार…. असे शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे जाहीरपणे बोलले. जरांगेच्या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जात जन्माने येते, शपथपत्र देऊन नाही असे छगन भुजबळ म्हणाले. यामुळे रविवारी ओबीसी नेते काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

भुजबळ ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत तेच सरकार मराठ्यांची मर्जी राखण्यासाठी अधिसूचना काढत असेल तर भुजबळांनी राजीनामा द्यावा, असे हरीभाऊ राठोड म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number