वाशी, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेची एक प्रत शनिवार २७ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिली. ही प्रत हाती घेत मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला इशारा दिला. ‘अधिसूचनेत नमूद असलेले मुद्दे पुढे पण कायम राहू देत… मराठ्यांनी उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका… आरक्षणात फसवणूक झाली तर पुन्हा उपोषण करू’ असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला दिला.
‘अधिसूचना मसुदा आता कायम राहू द्या’
‘मराठ्यांनी उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देवू नका’
‘आरक्षणात फसवणूक झाली तर पुन्हा उपोषण’
जरांगेंचा सरकारला इशारा