बिहारचे मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले आणि…

पाटणा, २३ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवन येथे पोहोचले. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात तब्बल चाळीस मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर बिहारचे मुख्यमंत्री राजभवनातून बाहेर पडले. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समजलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अमित शाह यांचे मोघम वक्तव्य […]

बिहारचे मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले आणि…

पाटणा, २३ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवन येथे पोहोचले. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात तब्बल चाळीस मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर बिहारचे मुख्यमंत्री राजभवनातून बाहेर पडले. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समजलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अमित शाह यांचे मोघम वक्तव्य

काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नितीश कुमार यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. नितीश कुमार यांच्यासाठी एनडीएचे अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दरवाजे आजही खुले आहेत का ? अशा स्वरुपाचा प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी ‘तसा प्रस्ताव आला तर विचार करू’ असे मोघम उत्तर दिले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number