हुतात्मा करसेवकांच्या स्मृती जतन होणार

अयोध्या, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामाचे मंदिर तयार झाले आहे. मंदिरात १८ जानेवारीला रामाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आता सोमवारी २२ जानेवारीला दुपारी १२:२० वाजता प्रभू श्रीरामाच्या डोळ्यांवरील पट्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उघडण्यात येणार आहे. प्रभू रामाचा अभिषेक करण्यापूर्वी मोदी राम मंदिर संकुलात पोहोचतील. गिद्धराज जटायूसह राम मंदिर आंदोलनात […]

हुतात्मा करसेवकांच्या स्मृती जतन होणार

अयोध्या, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामाचे मंदिर तयार झाले आहे. मंदिरात १८ जानेवारीला रामाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आता सोमवारी २२ जानेवारीला दुपारी १२:२० वाजता प्रभू श्रीरामाच्या डोळ्यांवरील पट्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उघडण्यात येणार आहे. प्रभू रामाचा अभिषेक करण्यापूर्वी मोदी राम मंदिर संकुलात पोहोचतील. गिद्धराज जटायूसह राम मंदिर आंदोलनात हुतात्मा झालेल्या करसेवकांना श्रद्धांजली वाहतील.

राम मंदिर संकुलात पंतप्रधान मोदी प्रभू रामाला अभिषेक करण्यापूर्वी जटायूच्या प्रतिमेची पायाभरणी करणार आहेत. त्याचबरोबर राम मंदिर आंदोलनात हुतात्मा झालेल्या करसेवकांच्या स्मरणार्थ बसवण्यात आलेल्या जटायूच्या पुतळ्यावर शहीद करसेवकांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शहीद करसेवकांच्या कुटुंबियांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

कडेकोट बंदोबस्त

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये कडेकोट बंदोबस्त आहे. अयोध्येत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू आहे. वाहनांना तपासणीनंतर अयोध्येत वावरण्यासाठी पास दिले जात आहेत. नागरिकांना आणि वाहनांना तपासणीनंतर सुरक्षा पास दिले जात आहेत. सुरक्षा पासशिवाय अयोध्येत वावरण्यास बंदी आहे. सगळीकडे उत्तर प्रदेश पोलीस तर महत्त्वाच्या ठिकाणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे जवान बंदोबस्त करताना दिसत आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे जवान पण ठिकठिकाणी बंदोबस्तावर आहेत. ड्रोनद्वारे अयोध्योतील घडामोडींची सतत हवाई पाहणी सुरू आहे.

रामाच्या दर्शनासाठी तरुणाने सोडली चक्क परदेशातील नोकरी

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक राम भक्त हे आयोध्येमध्ये दाखल होत आहेत. प्रत्येकजण रामा प्रतीची भक्ती व्यक्त करत आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील असणारा एक तरुण रामप्रतिष्ठेच्या सोहळ्याला उपस्थित राहता यावं यासाठी चक्क कुवेतची नोकरी सोडून अयोध्येत दाखल झाला आहे. जो राम का नाही वो किसी काम का नही असं म्हणत त्याने रामा प्रतीची भक्ती व्यक्त केलेली आहे.

अयोध्येत मुंबईचे रामभक्त

विविध राज्यातून आयोध्या नगरीमध्ये रामभक्त पोहोचत आहे. तर मुंबई मधूनही राम भक्त हे दर्शनासाठी पोहोचलेले आहेत. प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे. हा सोहळा प्रत्येकजण अनुभवू पाहतोय. अयोध्येत काही रामभक्त पोहोचलेले आहेत आणि त्यांचा उत्साह हा गगनाला भिडणारा आहे.

फुलांनी सजली अयोध्या नगरी

सण म्हटलं की सजावट आलीच. अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी फुलांचे आरास रचली जात आहे. सर्वत्र फुलांची सजावट केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number