…म्हणून विद्यापीठाच्या १४ परीक्षा लांबणीवर

मुंबई, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येच्या मंदिरात सोमवारी २२ जानेवारी रोजी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्त महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही सुटी असल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सोमवारी असलेल्या चौदा परीक्षा बुधवार ३१ जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाला विरोध करत २२ जानेवारीच्या सुटीवर विधी विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला […]

…म्हणून विद्यापीठाच्या १४ परीक्षा लांबणीवर

मुंबई, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येच्या मंदिरात सोमवारी २२ जानेवारी रोजी रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्त महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही सुटी असल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सोमवारी असलेल्या चौदा परीक्षा बुधवार ३१ जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाला विरोध करत २२ जानेवारीच्या सुटीवर विधी विभागाच्या चार विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. शिवांगी अग्रवाल, सत्यजीत साळवे, वेदांत अग्रवाल, खुशी बांगिया या चार विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीसाठी रविवारी विशेष खंडपीठ स्थापन करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number