सोलापूर, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय संस्था ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे. एकच सरकार सत्तेत असल्याने ईडीचा वापर करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे; असे राज्यसभा खासदार शरद पवार म्हणाले. ते रोहित पवार यांना ईडीने बजावलेल्या समन्सवर प्रतिक्रिया देत होते.
ईडीची भीती विरोधकांना दाखवली जात आहे. अनिल देशमुख, संजय राऊत या दोघांना ईडीची कारवाई करून तुरुंगात टाकले होते. ईडीचा वापर सरकार हत्यार म्हणून करत आहे; असे शरद पवार म्हणाले.
सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने बुधवार २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. बारामती अॅग्रो कंपनीच्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी चौकशी करायची असल्याचे सांगत ईडीने रोहित पवार यांना समन्स बजावले आहे.