आंतरवाली सराटी, २० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून समर्थकांसह मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. मुंबईत प्रजासत्ताक दिनी पोहोचून मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. आधी जरांगेंनी मुंबईत येऊन बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. पण आता जरांगेंनी शनिवारपासूनच बेमुदत उपोषण करण्याचा विचार बोलून दाखवला.