मुंबई, १९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी अर्थात सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी देण्यात आली आहे. या सुटीची मागणी भाजपाच्या अतुल भातखळकर यांनी केली होती. ही मागणी मान्य झाली आहे. याआधी केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारितील सर्व कार्यालयांना प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली आहे. तसेच देशातील अनेक भाजपशासीत राज्यांनी त्यांच्या अखत्यारितील सर्व कार्यालयांना प्राणप्रतिष्ठा दिनी सुटी जाहीर केली आहे.