मोदींचा एका दिवसात तीन राज्यांचा दौरा

नवी दिल्ली, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दिवसात तीन राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून होणार आहे. नंतर पंतप्रधान कर्नाटकमधील बंगळुरू आणि तामीळनाडूतील चेन्नईला जाणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी १०.४५ वाजता सोलापूरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव व भद्रावती या शहरात हाती […]

मोदींचा एका दिवसात तीन राज्यांचा दौरा

नवी दिल्ली, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दिवसात तीन राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून होणार आहे. नंतर पंतप्रधान कर्नाटकमधील बंगळुरू आणि तामीळनाडूतील चेन्नईला जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी सकाळी १०.४५ वाजता सोलापूरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव व भद्रावती या शहरात हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा, तर सांगली शहरातील मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १२०१ कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पांमुळे या शहरांतील नागरिकांना शुद्ध पाण्याचा शाश्वत पुरवठा तसेच मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे (पीएमस्वनिधी) प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात येईल. तसेच सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचे लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत.

महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान कर्नाटकमध्ये बंगळुरू बोइंग इंडिया इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी २.४५ वाजता आहे. तसेच पंतप्रधान बोइंग सुकन्या योजनेचा शुभारंभ पण करणार आहेत. विमान उद्योगाशी संबंधित क्षेत्रांमध्ये महिला वर्गाला अधिकाधिक संधी मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. कर्नाटकच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान तामीळनाडूतील चेन्नईत संध्याकाळी सहा वाजता ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’चे उद्घाटन करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number