मुंबई, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभा खासदार शरद पवार यांनी अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण नाकारले. पवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पण गर्दीत जाऊन दर्शन घेण्यापेक्षा मंदिर पूर्ण झाल्यावर दर्शनाला येईन असे पवारांनी सांगितले. त्यांनी पत्र लिहून श्रीराम जन्मूभूमी न्यासाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार नसल्याचे कळवले आहे. शरद पवारांनी रामाचे निमंत्रण टाळले. याआधी काँग्रेसच्या सोनिया गांधी, मलिकार्जुन खर्गे, अधीररंजन चौधरी यांनी तसेच डाव्या पक्षांच्या नेत्यांनी प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण नाकारले.