मुंबई, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या राखीव निधी वापराचा वाद पेटण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या राखीव निधीचा वापर विकासकामांसाठी करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. या निर्णयावर उद्धव गटाकडून आदित्यने टीका केली. यानंतर चिरीमिरी बंद झाल्यामुळेच आदित्यकडून राखीव निधीच्या मुद्यावर टीकाटीप्पणी सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. आदित्यची चिरीमिरी बंद झाली, असे शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत म्हणाले. यामुळे पुढील काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या राखीव निधी वापराचा वाद पेटण्याची शक्यता आहे.