मुंबई, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिंदेच्या नेतृत्नात कार्यरत आहे तीच खरी शिवसेना असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्षांनी दिलेल्या निकालात उद्धव गटाच्या याचिका फेटाळल्या. यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडे दिलेल्या प्रतिक्रियेत उद्धव महागद्दार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभाध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे हुकुमशाही, घराणेशाहीचा पराभव झाला असेही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही जनतेसोबत २०१९ मध्ये बेईमानी करणाऱ्यांना निकालाने चपराक दिली, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केला. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालत आहोत आणि यापुढेही चालत राहू असेही मुख्यमंत्री म्हणाले.