नवी दिल्ली, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत उद्धव गटाची लोकसभेसाठी महाराष्ट्रातील १५ जागांवर बोळवण झाल्याचे वृत्त आहे. काँग्रेस आणि सुप्रिया गटाला राज्यात लोकसभेच्या प्रत्येकी १४ जागा मिळणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला दोन आणि इतर पक्षांना तीन जागा देण्याबाबत विचार झाला आहे. यासंदर्भातला निर्णय अधिकृतरित्या अद्याप जाहीर झालेला नाही. याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लोकसभेच्या २३ जागा लढवल्या आणि १८ जागा जिंकल्या होत्या. पण मविआच्या बैठकीत त्यांना जिंकल्या त्यापेक्षाही कमी जागा मिळत असल्याचे वृत्त आहे. याउलट काँग्रेस आणि सुप्रिया गटाला त्यांनी जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्याचे वृत्त आहे.