श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण आले हो!

मुंबई, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी सोहळ्यासाठी सर्व हिंदू उत्सुक आहेत. याच सोहळ्यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले ही आमंत्रण पत्रिका नक्की कशी आहे याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे. ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे यांनाही प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या निमित्ताने सोहळ्याची आमंत्रण पत्रिका नक्की […]

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण आले हो!

मुंबई, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी सोहळ्यासाठी सर्व हिंदू उत्सुक आहेत. याच सोहळ्यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले ही आमंत्रण पत्रिका नक्की कशी आहे याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे. ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे यांनाही प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या निमित्ताने सोहळ्याची आमंत्रण पत्रिका नक्की कशी आहे ? या आमंत्रण पत्रिकेत काय आहे? सांगताहेत ‘जय महाराष्ट्र’चे संपादक प्रसाद काथे. पाहुया….

सोहोळ्याचं स्वरुप

१५ जानेवरी २०२४ : गाभाऱ्यात श्रीरामाच्या बालस्वरुप मूर्तीची स्थापना

१६ जानेवारी २०२४ : रामलल्लाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधी सुरू होणार

१७ जानेवारी २०२४ : या दिवशी रामलल्लाच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार

१८ जानेवारी २०२४ : अभिषेक विधीस सुरुवात, मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा

१९ जानेवारी २०२४ : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करणार

२० जानेवारी २०२४ : राम मंदिराचा गाभारा विविध नद्यांच्या पाण्याने भरलेल्या ८१ कलशांनी शुचिर्भूत केले जाणार

२१ जानेवारी २०२४ : रामलल्लाला १२५ कलशांसह दिव्य स्नान घालण्यात येईल

२२ जानेवारी २०२४ : मध्यकाळात मृग नक्षत्रात रामलल्लाची महापूजा

प्राणप्रतिष्ठा मुहूर्त : २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ८ सेकंद हा प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त
प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number