जागा वाटपाच्या मुद्यावर वंचितची भूमिका

मुंबई, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव गट यांच्यात चर्चा झाली. उद्धव गटाने वंचितला महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. तर सन्मान राखण्याएवढ्या जागा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मिळणार असतील तरच मविआत सहभागी होऊ, अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. पुरेश्या जागा मिळणार नसल्यास वंचित स्वतंत्रपणे लोकसभेसाठी […]

जागा वाटपाच्या मुद्यावर वंचितची भूमिका

मुंबई, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव गट यांच्यात चर्चा झाली. उद्धव गटाने वंचितला महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. तर सन्मान राखण्याएवढ्या जागा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी मिळणार असतील तरच मविआत सहभागी होऊ, अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. पुरेश्या जागा मिळणार नसल्यास वंचित स्वतंत्रपणे लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचा विचार करेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अद्याप महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच जागा वाटपाच्या मुद्यावर निर्णय झालेला नाही. जोपर्यंत ही बोलणी होत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत विचार करू शकत नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उद्धव यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. ‘मविआनं आधी जागा वाटपाचं सूत्र ठरवावं. त्यांचं जागा वाटप अंतिम झाल्यानंतर आम्ही पुढील गोष्टी ठरवू’ असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number