मुंबई, ४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचा विचार करून दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पण उपस्थित होते.
१. नोव्हें २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय
२. शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी २५० रुपये
३. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
४. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार
५. मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता
६. इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान
७. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी ” सिल्क समग्र २” योजना
८. वाईन उद्योग प्रोत्साहन योजना सात वर्ष राबवणार
९. नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता
१०. सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला