सुनील केदारचा जामीन फेटाळला

नागपूर, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यातील काँग्रेसचा नेता आणि माजी मंत्री सुनील केदार याने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. हा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळला. केदारसह सर्व दोषींवरील आरोप गंभीर आहेत. या परिस्थितीत जामीन देणे योग्य होणार नाही, असे सांगत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. […]

सुनील केदारचा जामीन फेटाळला

नागपूर, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यातील काँग्रेसचा नेता आणि माजी मंत्री सुनील केदार याने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. हा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळला. केदारसह सर्व दोषींवरील आरोप गंभीर आहेत. या परिस्थितीत जामीन देणे योग्य होणार नाही, असे सांगत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. आता सुनील केदार याच्यासह शिक्षा झालेले सर्व आरोपी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार करत आहेत. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली तसेच साडेबारा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number