जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

छत्रपती संभाजीनगर, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस शनिवार ३० डिसेंबर २०२३ पासून सुरू झाली. या गाडीच्या पहिल्या फेरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. पहिल्या जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची सहायक लोको पायलट होण्याचा मान तरुणीला मिळाला. ही तरुणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या पाल गावातील आहे. […]

जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

छत्रपती संभाजीनगर, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस शनिवार ३० डिसेंबर २०२३ पासून सुरू झाली. या गाडीच्या पहिल्या फेरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. पहिल्या जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची सहायक लोको पायलट होण्याचा मान तरुणीला मिळाला. ही तरुणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या पाल गावातील आहे. तरुणीचे नाव कल्पना धनावत असे आहे. कल्पानाला ही संधी २७ व्या वर्षी मिळाली.

मूळची पाल येथील कल्पना मदनसिंग धनावत हिचे वडील मदनसिंग हे एसटी महामंडळातून निवृत्त झाले आहेत. मदनसिंग हे कुटुंबीयांसोबत छत्रपती संभाजीनगरच्या मयूर पार्क भागामध्ये राहतात. कल्पनाने छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक पॉवर इंजीनिअरिंग या विषयात २०१६ मध्ये पदवी मिळवली आहे. त्यानंतर कल्पनाची २०१९ मध्ये रेल्वे विभागात परीक्षेद्वारे लोको पायलट पदावर निवड झाली. प्रशिक्षण घेऊन कल्पना आता लोको पायलट म्हणून काम करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number